६ मे रोजी बापूंचे रामराज्य २०२५ या विषयावर प्रवचन झाले आणि अनिरुध्दाज् इन्सिट्युट ऑफ ग्रामीण विकासाचे काम वेगाने सुरु झाले. थोड्याच दिवसात या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतः परमपूज्य बापू, नंदाई आणि सुचितदादा गोविद्यापीठम् ला आले.
ग्रामविकासाच्या या कार्यामध्ये असणार्या जलसंधारण, वनीकरण, पशुपालन तसेच सेंद्रिय शेती या विविध घटकांची कामे आता गोविद्यापीठ्म येथे सुरु होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बाभूळ (Acacia Arabica), घाणेरी किंवा टणटणी (Lantana) यांची रोपे तयार करायची आहेत . ज्या ज्या श्रध्दावानांना अशी रोपे तयार करण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर अशी रोपे तयार करून गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे अथवा कोणत्याही दिवशी गोविद्यापीठम् येथे जमा करावीत. रोपांच्या संख्येचे बंधन नसल्याने कितीही रोपे तयार करून आपण वरील ठिकाणी जमा करु शकता.
आता बघूया ही रोपे कशी तयार करायची
घाणेरी किंवा टणटणी (Lantana)
घाणेरीची रोपे तयार करण्यासाठी घाणेरीच्या झाडाची साधारण पेन्सिल एवढ्या जाडीची काडी निवडा. ही काडी तिरकी कापून घ्या म्हणजे मातीमध्ये ती पटकन रुजते. साधारण एक फुट ऊंचीची काडी कापून घ्या. या काडीवर शक्यतो २/३ डोळे आहेत याची खात्री करा. डोळे म्हणजे ज्या ठिकाणी नविन पाने फुटतात अशी जागा. नंतर या काडीवर फक्त दोनच पाने ठेवून बाकीची पाने काढून टाका.
आता कुंडी किंवा पिशवी घेऊन त्याला खाली २/३ भोके पाडा. त्यानंतर त्यामध्ये चांगली नर्सरी माती व शेणखत अथवा गांडूळखत समप्रमाणात घेऊन कुंडी किंवा पिशवी भरुन घ्या. त्यामध्ये ही घाणेरीची काडी लावा व लगेच हलके पाणी द्या. अशी तयार झालेली कुंडी किंवा पिशवी आडोश्याला परंतू भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशारितीने ठेवा. दररोज या कुंडीला किंवा पिशवीला पाणी घाला. साधारण ४/५ पाने फुटल्यावर ही रोपे गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे अथवा कोणत्याही दिवशी गोविद्यापीठम् येथे जमा करावीत.
बाभूळ (Acacia Arabica)
बाभळीची रोपे तयार करण्यासाठी बाभळीच्या बिया गरम पाण्यात भिजत टाका त्या सुमारे २४ ते ३० तास भिजू द्या म्हणजे त्या लवकर रुजतील.
आता कुंडी किंवा पिशवी घेऊन त्याला खाली २/३ भोके पाडा. त्यानंतर त्यामध्ये चांगली नर्सरी माती व शेणखत अथवा गांडूळखत समप्रमाणात घेऊन कुंडी किंवा पिशवी भरुन घ्या. त्यामध्ये एका कुंडीत किंवा पिशवीत २ या प्रमाणे ह्या भिजलेल्या बिया लावा. शक्यतो बिया लावण्याच्या जागी जास्तीत जास्त शेणखत किंवा गांडूळखत असू द्या म्हणजे बिया पटकन रुजतील त्यानंतर लगेच हलके पाणी द्या. अशी तयार झालेली कुंडी किंवा पिशवी आडोश्याला परंतू भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशारितीने ठेवा. दररोज या कुंडीला किंवा पिशवीला पाणी घाला. रोपे साधारण अर्धा/एक फूटाचे झाल्यावर ही रोपे गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे अथवा कोणत्याही दिवशी गोविद्यापीठम् येथे जमा करावीत.
अनिरुद्धाज इन्स्टीट्यूट ऑफ ग्राम विकासाला गावठी गुलाबांच्या रोपांची आवश्यकता आहे. सेवेत सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आपल्या घरीच गावठी गुलाबाची रोपे बनवून श्री हरिगुरुग्राम येथे अथवा अहिल्या संघात जमा करावीत. गावठी गुलाबाची रोपे उपलब्ध नसतील तर कुठल्याही गुलाबाची रोपे देखील चालतील.
No comments:
Post a Comment