"रामराज्य म्हणजे जसं राज्य रामाने अयोध्येत चालवले तसं राज्य. अयोध्येतले नागरिक जसे होते, तसे सर्वांनी बनणे, तशी समाज व्यवस्था तयार होणे, प्रत्येक व्यक्ती तशी तयार होणे, तसा सामष्ठीचा प्रतिसाद येणे म्हणजे रामराज्य आणि हे येणारच...
१०८ टक्के"...प.पू.सदगुरू श्री अनिरुद्ध बापू.
हे रामराज्य पाच स्तरांवर प्रगटणार आहे.
१. पहिला स्तर आहे - वैयक्तिक स्तर अर्थात व्यक्तिगत स्तर. प्रपंच आणि आध्यात्म ह्या दोहोंमध्ये रामराज्य आलं पाहिजे। सगळ्यातले सगळे बेस्ट म्हणजे रामराज्य. वैयक्तिक स्तरावरसुद्धा प्रपंच बेस्ट, बेस्टस्ट झाला पाहिजे. अध्यात्मातसुद्धा आमचं बेस्ट, बेस्टस्ट झालं पाहिजे.
२. दुसरा स्तर आहे - आप्त स्तर. कौटुंबिक स्तरावर, सहकुटुंब सहपरिवार स्तरावर रामराज्य येणार। कौटुंबिक स्तरावर प्रपंच आणि आध्यात्म ह्या दोहोंमध्ये रामराज्य आलं पाहिजे.
३. तिसरा स्तर आहे - सामाजिक स्तर. सामाजिक स्तरावर दोन्ही अंगांनी, भौतिक आणि नैतिक, रामराज्य आलं पाहिजे।
४. चौथा स्तर आहे - धार्मिक स्तर. धार्मिक स्तरावरसुद्धा रामराज्य दोन अंगांनी प्रगटणार आहे। प्रथम स्तर आहे धार्मिक शिक्षण. धार्मिक शिक्षण म्हणजे स्वतःच्या उन्नतीचे, अभ्युदयाचे शास्त्र. पवित्र मार्गाने स्वतःचा विकास कसा करायचा - ह्याचे शास्त्र म्हणजेच स्पिरितुअल म्हणजेच धार्मिक शास्त्र. दुसरा स्तर म्हणजे सामुहिक आणि वैयक्तिक धार्मिक आचरण.
५. पाचवा स्तर आहे - भारतवर्ष आणि जागतिक स्तर. भारतवर्षामध्ये आधी रामराज्य येणार आणि मग जागतिक स्तरावर.
रामराज्य: वैयक्तीक पातळीवर..
दैनंदिन करावयाच्या गोष्टी १. ५ - ६ कढीपत्त्याची पाने (सांबर, आमटी, किंवा कढीपत्त्याच्या चटणी मधून) दररोज खाणे. अस केल्याने एका वर्षात शरीरामध्ये अशी रसायने निर्माण होतात कि ज्याने ५० - ८०% कॅन्सर पासून प्रतिबंध होतो २. सूर्य प्रकाशात दररोज कमीत कमी अर्धा तास चालणे (दुपारी १ ते ३ ची प्रखर उन्हाची वेळ सोडून) ३. जेवणात फळांचा समावेश करणे ४. ३ - ४ लिटर पाणी दररोज पिणे ५. अध्यात्मिक गोष्टी: अ. आन्हीक चे २ वेळा पठण ब. गुरुक्षेत्रम मंत्राचे जमल तेवढ्या वेळा पठण क. श्रीमद पुरुषार्थाचे कमीत कमी एक पान दररोज वाचणे ड. संध्याकाळी घरी सगळ्यांनी मिळून ३ वेळा हनुमान चालीसाचे पठण ६. घरामध्ये तुळस, गुलाब, मोगरा, कढीपत्ता, झिपरी हि रोपे लावावी. ह्या मूळे घरातील प्राणवायूचे प्रमाण वाढतं.
दर वर्षी करावयाच्या गोष्टी १. पुरुषांसाठी, श्रावण सोमवारी सूर्यास्तानंतर, "श्री रणचंडिका प्रपत्ती".
२. महिलांसाठी, मकर संक्रांतिच्या दिवशी, "श्री मंगलचंडिका प्रपत्ती.
२६ जुन २०११ ह्या दिवशी फेसबुक ग्रुपतर्फे AIGV च्या सेवेसाठी गोविद्यपिठम येथे जाण्याची संधी मिळाली . बरेच श्रद्धावान श्रमदानासाठी सेवेसाठी रविवारी आले होते.फेसबुक गृपला जल संधारणची सेवा अर्थात बंधारा बांधण्याची सेवा आली होती.
No comments:
Post a Comment